मावळात पर्यटनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

मावळात पर्यटनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १७ : मावळ तालुक्यात शिरवता धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या सहापैकी दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.
आर्या सुशांत बांदावर (वय २०, रा. गोंदिया) व करण ज्ञानदेव ठोंबरे (वय १९, रा. सातारा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘‘सहा विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते. दरम्यान, आर्या आणि करण यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यावेळी पाय घसरून दोघेही बुडाले. त्यांच्या मित्रांनी ही माहिती कामशेत पोलिसांना दिली. त्यावर पोलिस पथक, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे पथक, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे सदस्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढून कामशेत येथील रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.’’
-------------
जाधववाडी धरणात बुडून युवकाचा मृत्यू
जाधववाडी धरणात बुडून शहानवाज अली अन्सारी (वय २१) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. शहानवाज हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, सध्या तो नवलाख उंबरे येथे वास्तव्यास होता. शहानवाज बुडत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, या घटनेची माहिती तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com