

तळेगाव दाभाडे, ता. ९ : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमांतर्गत सिंगापूरमधील आधुनिक व आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ शिक्षकांची अंतिम निवड झाली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील चार शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, आधुनिक अध्यापन तंत्रज्ञान तसेच शैक्षणिक प्रयोगांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील ३०३ समूह साधन केंद्रांमधून एक हजार १८७ शिक्षकांनी लेखी परीक्षा दिली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहभागातून लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा बहुस्तरीय निवड प्रक्रियेतून १५० शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यानंतर अंतिम फेरीतून ४५ शिक्षकांची सिंगापूर येथील शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली.
मावळमधून मनेष हिरामण उघडे (रामनगर), दीपाली श्याम अंगिर (पाटण), मैना विलास सरवदे (ब्राह्मणवाडी) आणि श्रीनिवास चक्रपाणि शिंदे (नवलाख उंबरे) यांची निवड झाली आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज आणि संदीप काळे यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.