होतकरू युवकांच्या मृत्यूने मावळात हळहळ

होतकरू युवकांच्या मृत्यूने मावळात हळहळ

Published on

टाकवे बुद्रुक, ता. ६ : नायगाव येथील अपघातात दोन होतकरू युवकांच्या झालेल्या मृत्यूने मावळ परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. हे दोन्ही युवक त्यांच्या घरी एकुलते एक होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा आधार काळाने हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे.

तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत असताना आंदर मावळातील शिंदे-घाटेवाडी येथील अनेक शिवभक्त हे रात्रीच्या वेळी किल्ले विसापूरकडे निघाले होते. त्यातील ओंकार आरडे व दर्शन शिंदे हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी कान्हे फाट्याहून कामशेत येथील पेट्रोल पंपावर निघाले असताना नायगाव हद्दीत मोटारीने दोन्ही तरुणांना चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण आंदर मावळात शोककळा पसरली आहे.

ओंकारच्या जाण्याने मित्रांना धक्का
ओंकार हा हिंदूराष्ट्र सेनेचा कार्यकर्ता होता. सामाजिक कार्यात पुढाकार घेत तो नेहमी सक्रिय असायचा. शिवजयंतीच्या कार्यात सहभागी असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या सहकारी मित्रांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

बेशिस्त वाहनचालक वाढले
मावळातील शहरी, ग्रामीण भागांत चारचाकीच्या काचेला काळ्या फिल्म लावणे, वाहनांचे दिवे प्रखर अतिशुभ्र लावणे, वाहनांमध्ये बदल करणे, रंग बदलणे असे प्रकार वाढत आहेत. याच वाहनांचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती आलेले दिसत आहे. काही तरुण नशायुक्त पदार्थ खाऊन तसेच मद्यपान करून वाहने चालवत आहेत. हे प्रकार इतरांसाठी धोक्याचे ठरत असून पोलिसांनी दंडात्मक, कठोर कारवाई वाढवण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com