खासदार बापट यांना तळेगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली

खासदार बापट यांना तळेगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली

तळेगाव स्टेशन, ता. २२ : तळेगावात बालपण गेलेले पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांना तळेगावात गुरुवारी (ता.२०) सायंकाळी नाना नानी पार्क येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गणपत काळोखे यांच्यासह मान्यवरांनी बापट यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, जनसेवा समितीचे प्रवर्तक किशोर आवारे, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, भाजप शहराध्यक्ष रवींद्र माने, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रेय भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संदीप शिंदे, मनसेचे सचिन भांडवलकर आदींसह सर्वपक्षीय मान्यवरांनी बापट यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या तळेगावातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशक आणि विनायक भेगडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com