अनधिकृत संरक्षक भिंतींवर
 तळेगाव नगरपरिषदेची कारवाई

अनधिकृत संरक्षक भिंतींवर तळेगाव नगरपरिषदेची कारवाई

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ११ : विनापरवाना बांधण्यात आलेली आणि सार्वजनिक रहदारीस अडथळा ठरणारी संरक्षक भिंत तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने शुक्रवारी (ता. ७) जेसीबीच्या साहाय्याने पाडून जमीनदोस्त केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील शनिवार पेठेत एका नागरिकाने नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेता संरक्षक भिंत बांधली होती. या अनधिकृत संरक्षक भिंतीमुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार नगरपरिषद प्रशासनाकडे करण्यात आली होती.

प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतर नोटीस देऊनही अतिक्रमण करणाऱ्याने खुलासा न केल्यामुळे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले. नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अनधिकृत संरक्षक भिंत पाडून सार्वजनिक रस्ता खुला केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत नागरिकांसह व्यवसायिकांनी विनापरवाना उभारलेली होर्डिंग्ज, फलक, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तत्काळ काढून घ्यावीत. अन्यथा नगरपरिषदेकडून ती लवकरच काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.