‘वन्यजीवरक्षक’च्या सामाजिक कार्याला ‘इंजिन’
नायडू दांपत्य आणि जागरुक कट्टातर्फे बोटीसाठी भरीव मदत

‘वन्यजीवरक्षक’च्या सामाजिक कार्याला ‘इंजिन’ नायडू दांपत्य आणि जागरुक कट्टातर्फे बोटीसाठी भरीव मदत

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ५ ः आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला त्वरेने धावून जाणाऱ्या येथील वन्यजीवरक्षक मावळ संस्थेच्या जीवरक्षक बोटीला सुमारे दीड लाख रुपये किमतीचे इंजिन इंद्रायणी रमाकांत नायडू आणि जागरूक कट्टा समूहातर्फे गुरुवारी (ता. ४) भेट देण्यात आले.
वन्यजीवरक्षक मावळ संस्था वापर करीत असलेल्या जीवरक्षक बोटीचे इंजिन खराब झाल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे नीलेश गराडे यांनी या बोटीसाठी लागणारे नवीन इंजिन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जागरूक वाचक कट्टा-हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत स्वेच्छेने जवळपास २० हजारांहून अधिक रक्कम जमा झाली. ज्येष्ठ दानशूर रमाकांत नायडू यांनी यात सिंहाचा वाटा उचलून, बोटीची पूर्ण किंमत संस्थेस देऊ केली. या नवीन इंजिनाचे लोकार्पण गुरुवारी (ता. ४) सायंकाळी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर, वडगाव मावळचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, इंद्रायणी रमाकांत नायडू दांपत्य आणि जागरूक वाचक कट्टा समूह सदस्यांच्या हस्ते वन्यजीवरक्षक मावळ संस्थेस करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार पं. सुरेश साखवळकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, विश्वास देशपांडे, गणेश बोरुडे, सुनील जैन, संदेश भेगडे आदींसह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, ‘‘दातृत्वाचे आत्मिक समाधान सर्वाधिक आहे. आपदा मित्र निःस्वार्थीपणे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचे झोकून काम करतात. समाजाकडून प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक व्हायला हवे. ’’
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी नायडू दांपत्य आणि जागरूक वाचक कट्टाचे कौतुक केले. सुरेश साखवळकर यांनी नायडू कुटुंबीयांच्या दातृत्वाचे कौतुक केले. लोणावळ्यात नुकत्याच झालेल्या धबधबा दुर्घटनेतील पाच मृतदेह शोधून बाहेर काढल्याबद्दल नीलेश गराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. अनंत परांजपे, प्रमोद पवार, शीतल शेटे, नीलेश गराडे यांनी मनोगत व्यक्त केले. जागरूक वाचक कट्टा समूहाचे प्रमोद देशक यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप डोळस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद बोराडे यांनी आभार मानले. जागरूक वाचक कट्टा समूहातर्फे संजय चव्हाण, राजेश बारणे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, उपाध्यक्ष प्रमोद ओव्हाळ, गणेश निसाळ, गणेश ढोरे, किरण मोकाशी, भास्कर माळी, विलास गायकवाड, गणेश गायकवाड, रोहीत दाभाडे,सर्जेस पाटील,ओमकार भेगडे आदी सहकाऱ्यांनी नियोजन केले.

फोटोः 05101

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.