

तळेगाव स्टेशन, ता. ३० : समाजमाध्यमांवर खोट्या आशयाचा मजकूर प्रसिद्ध करून फोटोत छेडछाड करून बदनामी केल्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सदस्य संतोष मारुती ऊर्फ छबूराव भेगडे यांनी मंगळवारी (ता. २७) तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. माझे सामाजिक आर्थिक आणि राजकीय नुकसान करण्याच्या हेतूने बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करीत संतोष भेगडे यांनी नारायण मालपोटे, अतुल मराठे, किशोर सावंत, अक्षय धामणकर, भरत येवले, प्रशांत जांभळे इतर जणांविरुद्ध सायबर गुन्ह्याअंतर्गत कारवाई करून मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.