तळेगाव एमआयडीसीत औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण

तळेगाव एमआयडीसीत औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण
Published on

तळेगाव स्टेशन, ता. २८ : तळेगांव एमआयडीसीमधील औद्योगिक आस्थापनांसाठी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासह विविध सुरक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त तळेगाव दाभाडे औद्योगिक संघटना व औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाच्या विद्यमाने बुधवारी (ता.२६) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाच्या अतिरिक्त संचालक शारदा होंदुले, उपसंचालक तृप्ती कांबळे यांनी गतकाळात कारखान्यात झालेल्या अपघातांच्या संदर्भातील तपशीलवार अभ्यासाबद्दल (केस स्टडी) सखोल मार्गदर्शन केले.उ पस्थितांना सुरक्षेसंबंधी सर्वोत्तम सरावाबाबत (बेस्ट प्रॅक्टिसेस) मार्गदर्शन करण्यात आले. तळेगांव दाभाडे औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षा अनु सेठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विनायक साळुंखे यांनी सूत्रसंचलन, संघटनेचे सचिव जगदीश यादव आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.

स्पर्धा आणि प्रावीण्यप्राप्त कर्मचारी
सुरक्षा फलक : ऐश्वर्या ढमढेरे, स्वप्नील पहाड, गजानन मुंढे, जितेंद्र राणे
सुरक्षा कविता : दिलीप भेले, वैशाली सोलट, राजू लगड आणि विजय पाटील
सुरक्षा घोषवाक्य : अमोल ठोंबरे, नजमा शेख, सत्यम लोधी आणि आदिनाथ ठोंबरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com