बंजारा सेवा संघातर्फे वसंतराव नाईक यांना अभिवादन
वसंतराव नाईक यांना
बंजारा संघातर्फे अभिवादन
तळेगाव स्टेशन, ता. २ : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १) मावळ तालुका बंजारा सेवा संघातर्फे अभिवादन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर्नाटकमधील विजापूरचे जिल्हा परिषद सदस्य रामू राठोड, मावळ तालुका बंजारा सेवा संघाचे संस्थापक हिरा जाधव, मावळ तालुकाध्यक्ष महादेव राठोड,उपाध्यक्ष चंदू राठोड, खजिनदार राजू पवार, सचिव नितीन चव्हाण, अर्जुन आढे, शेट्टी चव्हाण, जयराम चव्हाण, यंका राठोड, सोमा राठोड आदींसह बंजारा समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्यासह बंजारा सेवा संघाचे पदाधिकारी.
फोटो ः 05992
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.