तिकोना गडावर रविवारी स्वच्छता मोहीम

तिकोना गडावर रविवारी स्वच्छता मोहीम

Published on

तळेगाव स्टेशन, ता. २३ : मावळ तालुक्यातील तिकोना गडावर स्वच्छता, संवर्धन व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता.२७) सकाळी सात वाजल्यापासून गडावरील पुरातन वास्तूंसह परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी ‘आपला मावळा’ संघटनेने पुढाकार घेतला आहे.
नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था संघटनेतर्फे उपलब्ध करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. मावळातील गडकिल्ले प्रेमी तरुणांनी आपली नोंदणी करुन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ‘आपला मावळा’ संघटनेचे तळेगाव दाभाडे येथील समन्वयक अभिजित सोनवणे यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com