मंदिरांच्या प्रतिकृतींमुळे गणेशोत्सवाला भव्यता

मंदिरांच्या प्रतिकृतींमुळे गणेशोत्सवाला भव्यता

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ३० : गणेशोत्सव हा परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. सध्या या निमित्त सर्वत्र चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवात तळेगाव स्टेशन परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही विविध मंदिरांच्या प्रतिकृतींमध्ये श्री गणेशाची स्थापना केली आहे. यामुळे भाविकांना आपल्या परिसरातच देशभरातील विविध मंदिरांची अनुभूती येत आहे.

तळेगाव रेल्वे स्टेशनसमोर यशवंतनगर भागात वीरचक्र मित्र मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राजस्थामधील गुलाबी ‘हवा महाला’ची प्रतिकृती उभारली आहे. झुंबराने सजलेल्या महालात गणेशमूर्तीची स्थापना करुन आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे अध्यक्ष आदित्य नरवडे आणि कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पै. सचिनभाऊ शेळके मित्रमंडळाचे यंदा १९वे वर्ष आहे. मंडळाने गणेशमूर्तीमागे सोनेरी मखरात तिरुपती बालाजीच्या मूर्तीची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचे अध्यक्ष गिरीश सावंत आणि कार्यकर्ते नियोजन करत आहेत. याच भागातील शिवशक्ती मित्रमंडळाच्या मंडपामध्ये विराजमान भव्य गणेशमूर्तीमागे धनुष्यधारी प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती आणि दुतर्फा सोनेरी गजराज गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे हे २७वे वर्ष असून अध्यक्ष आशिष भांडवलकर यांच्यासह कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. तपोधाम कॉलनीमधील स्वराज्य मित्र मंडळाने रंगीबेरंगी झालरींच्या आकर्षक मंडपामध्ये दगडूशेठ गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. करण शेळके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवाचे नियोजन करीत आहेत.
विठ्ठलवाडी एसटी डेपोसमोरील अमरहिंद मित्र मंडळाचे यंदा ५४वे वर्ष आहे. त्यांनी लालबागच्या राजाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान असलेल्या मंदिराला झुंबरांसह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरज शिंदे आणि कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
स्टेशन चौकातील चाकण रस्त्यावरील श्री साईनाथ तरुण मित्रमंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. मंदिरासमोरील नंदी आणि मंदिरातील शिवलिंगाच्या समोर भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे. मंडळाचे हे ४८वे वर्ष असून, अध्यक्ष अथर्व राक्षे आणि मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
फलकेवाडी मित्र मंडळाचे यंदा ६९वे वर्ष असून रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या राजवाड्याच्या गाभाऱ्यात भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे. नेत्रदीपक विद्यत रोषणाई करण्यात आली आहे. मंडळातर्फे रक्तदान शिबिर, अनाथाश्रम, वृद्धश्रमास अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते. अध्यक्ष अनिकेत मराठे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
गुरुवार पेठेतील मानाचा पहिला गणपती जागृती मित्रमंडळाचे यंदा ६४वे वर्ष आहे. येथे भव्य मंडपामध्ये विराजमान फेटेधारी भव्य गणेशमूर्तीभोवती आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. अध्यक्ष शैलेश भेलके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करत आहेत. मंडळातर्फे सहाव्या दिवशी दोन हजार लाडूंच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
हरणेश्वरवाडी येथील एसटी बसस्थानकाच्या आवारातील एकता मित्र मंडळाने यंदा दगडूशेठ गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. मंडपात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडळाचे हे ३६वे वर्ष असून अध्यक्ष चेतन ओव्हाळ आणि कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
सेवाधाम हॉस्पिटलसमोरील मंगलमूर्ती मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या मंडपामध्ये लालबागच्या राजाच्या भव्य गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. मंडळाचे यंदा ३१वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष अंकित नाईकनवरे यांच्यासह कार्यकर्ते नियोजन नियोजन करीत आहेत.
मनोहरनगरमधील वरदविनायक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे यंदा २५वे वर्ष आहे. स्वागत कमानीवर श्री विठ्ठलासह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती विराजमान असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अध्यक्ष सागर काकडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.मंडळातर्फे अथर्वशीर्ष पठण, चिमुकल्यांसाठी आनंद मेळावा, महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com