इंद्रायणी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

इंद्रायणी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

तळेगाव स्टेशन, ता. २३ : श्री बाळासाहेब बाबूराव शेळके एज्युकेशन सोसायटी संचलित पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. ‘रेट्रो ते मेट्रो’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनामध्ये जुन्या आणि नव्या युगातील जीवनशैली,पोशाख, वाहतूक व्यवस्था, कृषी क्षेत्र, मनोरंजनाच्या बदलत्या ट्रेंडवर विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि नृत्य शैलीच्या सादरीकरणातून प्रकाश टाकला.
तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, सचिव रंगनाथ बोरकर, अण्णासाहेब भेगडे, नगरसेवक संदीप शेळके, सुमित्रा लांडगे, संजय शेळके, गिरीश सावंत, राहुल भवार आदी यावेळी उपस्थित होते. नटराज पूजन करून शक्ती-भक्तीच्या पवित्र संगमावर शिवगर्जनेने स्नेहसंमेलन सुरू झाले.
नगराध्यक्ष दाभाडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून, शाळेद्वारे केले जाणारे कार्य उत्तम आहे. शिक्षित व प्रगल्भ नागरिक ही देशाची गरज आहे. उद्याची सुदृढ,संयमी आणि विचारशील पिढी आपल्या उत्तम कार्याद्वारे देशाला महासत्ता बनवू शकेल.’’
संचालिका मोनिका शेळके यांनी संस्थेमार्फत अत्यल्प शैक्षणिक शुल्कात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली. माजी विद्यार्थिनी कार्तिकी तुमकर, वैष्णवी भोसले, परा ढगे यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पालक प्रतिनिधी ज्योत्स्ना मांडेकर यांनी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले. मुख्याध्यापिका रत्नमाला कापसे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. उपमुख्याध्यापिका शमशाद सय्यद यांनी पाहुण्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन केले. विद्यार्थी समृद्धी घोजगे, संग्राम ओझरकर, स्वरा पाटील, आदिती कुलकर्णी, आरुष साहू, पार्थ कवळे, शौनिक फाळके, समर्थ पोतदार आदींनी सूत्रसंचालन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com