एकाच कंपनीत तिसऱ्यांदा
चोरी करण्याचा प्रयत्न फसला

एकाच कंपनीत तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न फसला

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ३१ : एकाच कंपनीचे साहित्य सलग तिसऱ्यांदा चोरण्याचा चार जणांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. मावळ तालुक्याच्या जांबवडेतील एका खासगी कंपनीमधील साडेचार लाखांचे साहित्य चोरणाऱ्या चार जणांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. चोरीसाठी वापरलेल्या वाहनासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
लखन सुरेश अवचिते (वय ३७, नागेश्वर विद्यालय समोर, मोशी), अमन अग्रम शेख (२१), फरीद अन्वर शेख (३५),अजय बुकल तानती (२५, तिघे रा. बर्गे वस्ती, चाकण) अशा आरोपींची नावे आहेत. जांबवडे-सुदवडी रस्त्यावरील बद्रीविशाल केमिकल ॲण्ड फार्मास्युटिकल कंपनीतून गेल्या २३ डिसेंबरला अज्ञात चोरट्यांनी तांबे, ॲल्युमिनिअम, लोखंडाच्या वस्तू, मोटर पंप असे तीन लाख ४४ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. त्यानंतर कंपनीचे मालक दीपक भोपालसिंग रावत (वय ४७, वतननगर, तळेगाव दाभाडे) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंपनीच्या परिसरात पोलिस पथक आरोपींच्या मागावर होते. त्यानंतर २१ जानेवारीला त्याच ठिकाणी काही काही जण चोरी करीत असल्याचे सीसीटीव्हीमुळे स्पष्ट झाले. मग २४ जानेवारीला पहाटे पुन्हा चोरट्यांनी त्याच ठिकाणी येऊन कंपनीतील साहित्य चोरले. हे साहित्य भंगारवाल्याला विकण्यासाठी आले असताना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले. कंपनीतून चोरलेल्या सर्व मुद्देमालासह चोरीसाठी वापरलेला एक लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी हस्तगत केला. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com