अजितदादांची तळेगावात
आज रक्षा कलश यात्रा

अजितदादांची तळेगावात आज रक्षा कलश यात्रा

Published on

तळेगाव स्टेशन, ता. २ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी (ता. ३) सकाळी तळेगाव दाभाडे शहरात रक्षा कलश दर्शन यात्रा आयोजित केली आहे. सकाळी ९ वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील लिंब फाटा येथून यात्रेस सुरवात होईल. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप होईल. लिंब फाटा - मारुती मंदिर चौक - बाजारपेठ - गणपती चौक - शाळा चौक -जिजामाता चौक - नगरपरिषद कार्यालय - स्टेशन चौक - मराठा क्रांती चौक मार्गे यशवंतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर समारोप होईल, अशी माहिती तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राजर्षी शाहु महाराज ज्येष्ठ साहित्यिक समिती व कलावंत मानधन योजना समिती, पुणे जिल्हाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com