निर्भयपणे संकटांना सामोरे 
जाणाऱ्यांचेच जीवनगाणे सुरेल

निर्भयपणे संकटांना सामोरे जाणाऱ्यांचेच जीवनगाणे सुरेल

Published on

तळेगाव स्टेशन, ता. १२ : ‘दारिद्र्य, अडचणी, संकटे हेच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. दिवसभर एकही समस्या उद्‍भवली नाही, तर तुमची दिशा चुकली असे समजावे. निर्भयपणे संकटांना सामोरे जाणाऱ्यांचेच जीवनगाणे सुरेल होऊ शकते,’ असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. सुनील धनगर यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हिंदमाता व्याख्यानमालेत ‘जीवनगाणे गातच रहावे’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना मंगळवारी (ता. १०) डॉ. सुनील धनगर बोलत होते. श्रीरंग कलानिकेतनचे अध्यक्ष राजीव कुमठेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, संस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे, बाळासाहेब शिळीमकर, शिवाजी पवार, राहुल पारगे, प्राचार्य श्रीकृष्ण मोहिते, संचालक अनिल वेदपाठक, देवराम वाघोले, नामदेव आंद्रे, प्रकाश गायकवाड आदींसह श्रोते उपस्थित होते.
डॉ. धनगर पुढे म्हणाले, ‘‘जीवनात दिशा शोधण्याचे कार्य केल्यास आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळते. वाचनाचा आनंद घेतला पाहिजे. शब्दात प्रचंड ताकद असते. शब्दच आयुष्याचे सोने करतात तसेच विचारवंत, संतांचे विचारही आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. आज अनाथ आश्रम वाढण्याऐवजी वृद्धाश्रम वाढताहेत ही चिंतेची बाब आहे’’
आपला प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवताना डॉ. धनगर यांनी शून्यातून विश्व निर्माण करताना आव्हानांना न घाबरता ध्येय कसे गाठले? याबाबत उहापोह केला. पतसंस्थेचे सचिव कैलास भेगडे, प्रदीप टेकवडे, सुहास धस यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत वाघोले यांनी आभारप्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com