आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी संघटित व्हा : पवळे
तळेगाव स्टेशन, ता. २२ : ‘‘आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे. संस्कृती जतनासाठी स्वदेशी, पर्यावरण, सामाजिक समरसता, एकत्र कुटुंब व्यवस्था, राष्ट्रीय कर्तव्य पाच मूल्यांचा अवलंब करावा,’’ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वक्ते अविनाश पवळे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बनेश्वर वस्ती (भाग) तळेगाव दाभाडेच्या वतीने गुरुवारी (ता.१९) ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात विशाल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले.
संमेलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. अविनाश पवळे, नथुराम महाराज जगताप (पाटीलबुवा), डॉ. लीना कवितके आणि संयोजक राजेश सरोदे व्यासपीठावर, तसेच संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होते.
नथुराम महाराज यांनी विविध आव्हानांवर विचारमंथन केले. तसेच धर्म, संस्कृती, परंपरा जतन करण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण टाळून आपल्या परंपरा जपण्याचे आवाहन केले. डॉ. लिना कवितके यांनी ‘‘आपल्या घरातील महिला, माता, तरुण मुलींचा सर्वांनी आदर करावा. आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करावेत. त्यामुळे भविष्यातील विविध समस्या निर्माण होणार नाहीत,’’ असे सांगितले. साहील नाटक, श्रीराम भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे संयोजक राजेश सरोदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

