दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Published on

तळेगाव स्टेशन, ता.२३ : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवारी (ता.२३) अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
उद्योजिका समृद्धी ढमाले कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, सचिव मिलिंद शेलार, सहसचिव तथा शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, खजिनदार सुदाम दाभाडे, संचालक ॲड. श्रीराम कुबेर, सल्लागार कुसुम वाळुंज आदींसह विद्यार्थी आणि पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
मुख्याध्यापिका रेणू शर्मा यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक सिद्धेश्वर सोनवणे, वर्गशिक्षक सचिन झेंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धांमध्ये यशप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विद्यार्थिनी स्वामिनी धोत्रे, आकांक्षा साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका संध्या शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com