तळेगावात शिवजयंतीनिमित्त अभिवादन
तळेगाव स्टेशन, ता. ७ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव फाल्गुन तृतीयेला तिथीनुसार शुक्रवारी (ता. ६) उत्साहात साजरा करण्यात आला. तळेगाव दाभाडेतील अपेक्स सोसायटी, गुलमोहर सोसायटी, साई रेसिडेन्सी, काकडे संजीवनी सोसायटी, उमंग सोसायटी, साई निर्मिती सोसायटी यांच्या वतीने संयुक्त शिवजयंती सोहळा पार पडला. वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. युवा शिवव्याख्याते रुद्रप्रताप बोराडे यांचे व्याख्यान झाले. शिवजयंतीनिमित्त आयोजित भाषण स्पर्धेमध्ये २० मुलांनी सहभाग नोंदवला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वच्छता दूत महिला भगिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाळासाहेब दाभाडे, सागर शिळीमकर, गोपाल पाटील, लहुजी लोखंडे, श्रीमंत ताटे आदींसह सोसायट्यांमधील रहिवासी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रवक्ते जिजाभाऊ सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. सलीम शेख, अलीम शेख, प्रवीण शिंदे, गौरव वाडेकर, नागेश अभंगे, बजरंग शिवणकरजी, नानासाहेब मोटे आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

