Sat, Jan 28, 2023

वडगावमध्ये आज
बालोद्यानाचे लोकार्पण
वडगावमध्ये आज बालोद्यानाचे लोकार्पण
Published on : 7 January 2023, 12:08 pm
वडगाव मावळ, ता. ७ ः वडगाव नगरपंचायतीचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक शंकरराव भोंडवे यांच्या सौजन्याने माळीनगर येथे उभारण्यात आलेल्या बालोद्यानाचे लोकार्पण रविवारी (ता. ८) करण्यात येणार आहे.
नगरसेवक भोंडवे यांनी माजी आमदार स्व. दिगंबर भेगडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माळीनगर येथे बालोद्यान उभारले आहे. त्याचे लोकार्पण पक्षाचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी साडे नऊला होणार आहे.