‘पक्षी वेळेत उचलून न्यावेत’ पोल्ट्री व्यावसायिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पक्षी वेळेत उचलून न्यावेत’ पोल्ट्री व्यावसायिक
‘पक्षी वेळेत उचलून न्यावेत’ पोल्ट्री व्यावसायिक

‘पक्षी वेळेत उचलून न्यावेत’ पोल्ट्री व्यावसायिक

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ९ ः मावळ तालुक्यातील पोल्ट्री कंपन्यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना संवर्धनासाठी दिलेले पक्षी वेळेत उचलून (लिफ्टिंग) न्यावेत अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेने केली आहे. संघटनेच्या कार्यकारी मंडळाची विशेष सभा वडगाव येथे संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, तालुका उपाध्यक्ष संतोष घारे, सचिव प्रवीण शिंदे, महेश कुडले, विनायक बंधाले, बाबाजी पाठारे, अमोल शिंदे, शिवाजी कारके, सचिन गरुड, गणेश आलम उपस्थित होते. मावळ तालुक्यातील काही पोल्ट्री कंपन्या तयार झालेले पक्षी उचलून घेऊन जाण्यासाठी खूप विलंब करतात. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अकारण खर्च वाढून नुकसान सोसावे लागते. कंपन्या आणि फार्मर यांच्यातील कराराप्रमाणे संवर्धनासाठी दिलेले पक्षी ४० ते ४५ दिवसात कंपन्यानी घेऊन जाणे अपेक्षित आहे. मात्र काही कंपन्या या ५५ ते ६० दिवस होईपर्यंत पक्षी नेत नाहीत. परिणामी या वाढीव काळात पक्षी मरण पावल्यास फार्मरना मोठा तोटा सोसावा लागतो. त्यामुळे तयार झालेले पक्षी कंपन्यानी वेळेवर उचलावेत अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.