शर्यती गाजवणाऱ्या बैलाचा वडगावात मूत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शर्यती गाजवणाऱ्या बैलाचा वडगावात मूत्यू
शर्यती गाजवणाऱ्या बैलाचा वडगावात मूत्यू

शर्यती गाजवणाऱ्या बैलाचा वडगावात मूत्यू

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.१२ : नवलाख उंब्रे (पडवळ वस्ती) येथे मंगळवारी रात्री एका गोठ्याला लागलेल्या आगीत बैलगाडा शर्यतीच्या तीन बैलांचा होरपळून मृत्यू झाला होता तर दोन बैल गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेबाबत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलगाडा मालक तानाजी बबन पडवळ यांच्या घराजवळील गोठ्याला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा भस्मसात झाला व पाच जनावरे होरपळली. त्यातील तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोन बैलांवर उपचार सुरू होते. त्यातील एकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे पडवळ यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. त्याच बरोबर पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ केलेल्या व बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यात अनेकदा पहिला क्रमांक मिळवून नावलौकिक मिळवून दिलेल्या बैलांचा असा मृत्यू झाल्याने पडवळ कुटुंबाला मोठे दुःख झाले आहे. या दुर्घटनेबद्दल तालुक्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे. पंचक्रोशीतील अनेक बैलगाडा मालक, शौकीन व शेतकरी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. दरम्यान, या घटनेची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.