‘संजय गांधी निराधार’च्या 
लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्यावे’

‘संजय गांधी निराधार’च्या लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्यावे’

वडगाव मावळ, ता. १६ : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दर महिन्याला नियमितपणे मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, दिव्यांग विकास संस्था अध्यक्ष किशोर दिघे, सचिव राज चव्हाण, गणेश लालगुडे, माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर, अंबिका नगरकर, परमेश्वर वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांनी या बाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार मांडवे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, निराधार विधवा भगिनी, निराधार बालक-पालक यांना अनुदान दिले जाते. या सर्व लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना दरमहा नियमितपणे व वेळेवर अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. या योजनेसाठी उत्पन्न दाखला अट शिथिल करावी, कागदपत्रे देणे-घेणे, गहाळ होणे यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबरचे अनुदान काही लाभार्थ्यांना मिळाले नाही. ते त्यांना त्वरित देण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com