वडगाव न्यायालयात
शिवजयंतीनिमित्त उपक्रम

वडगाव न्यायालयात शिवजयंतीनिमित्त उपक्रम

वडगाव मावळ, ता. २२ : वडगाव न्यायालयात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. वडगाव मावळ बार असोसिएशनने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. ॲड. रवींद्र यादव यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी डॉ. प्रमोद बोराडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची न्याय व्यवस्था या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बोराडे यांनी इतिहासातील दाखले देत व शिवकालीन पत्रांचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायदान पध्दतीचा इतिहास अतिशय सुंदर रीतीने मांडला. वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. संजय वांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयोजन केले. प्रास्ताविक ॲड. विनय दाभाडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com