Sun, March 26, 2023

केशवनगर प्रभागीतील मूलभूत सुविधांसाठी साकडे
केशवनगर प्रभागीतील मूलभूत सुविधांसाठी साकडे
Published on : 9 March 2023, 3:14 am
वडगाव मावळ : नगरपंचायत हद्दीतील केशवनगर भागातील प्रभाग क्रमांक एकमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता, ड्रेनेज, पथदिवे आदी सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांनी या भागातील संजीवनी केदारे, अश्विनी गायकवाड, राणी कुंभार, कल्पना जगताप, जयश्री कासार, सरोज गायकवाड, सारिका धडवले आदी रहिवाशांसह वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांची भेट घेऊन असुविधांबाबत गाऱ्हाणे मांडले.