Wed, March 29, 2023

भारती शिंदे यांचा सत्कार
भारती शिंदे यांचा सत्कार
Published on : 14 March 2023, 12:12 pm
वडगाव मावळ, ता. १४ ः मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्यावतीने इंगळुण येथील पोल्ट्री उद्योजिका भारती उत्तम शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोल्ट्री संघटनेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रविण शिंदे, महेश कुडले, विनायक बधाले, सचिन आवटे, सुरेश खरमारे, उत्तम शिंदे, सीताराम शिंदे, रवि जोरी, संचित पठारे, रोहिदास शिंदे आदी उपस्थित होते. कुक्कुटपालन व्यवसाय हा महिलांसाठी अतिशय फायदेशीर असून, तो अधिक किफायतशीर होण्यासाठी महिलांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन गोपाळे यांनी केले.
छायाचित्रओळी
इंगळूण ः पोल्ट्री उद्योजिका भारती शिंदे यांचा सत्कार करताना पोल्ट्री संघटनेचे पदाधिकारी.
फोटोः 05280