वडगावात श्रीराम नवमी निमित्त मिरवणूक

वडगावात श्रीराम नवमी निमित्त मिरवणूक

वडगाव मावळ, ता. ३१ : श्रीराम नवमी निमित्त येथील श्रीराम मित्र मंडळाने भव्य मिरवणुकीसह महोत्सवाचे आयोजन केले होते. येथील मधुबन कॉलनीत आयोजित महोत्सवात सकाळी ताजुबाई बाल भजनी मंडळाचे भजन व दुपारी बारा वाजता उत्साहाच्या वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. सायंकाळी रथातून श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात भगवे फेटे घालून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक सहभागी झाले होते. छावा प्रतिष्ठान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर सत्कार समारंभ व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. आमदार सुनील शेळके यांनी महोत्सवाला भेट दिली. श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष विकी भोसले, महेश ढगे, अंकुश तुमकर, मंगेश गायकवाड, दत्तात्रेय तारु, मंगेश धडवले, गुलाब शिंदे, सचिन पंडागळे आदींनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com