मळवली-लोहगड दरम्यान
वाहतूक नियोजन उत्तम

मळवली-लोहगड दरम्यान वाहतूक नियोजन उत्तम

Published on

वडगाव मावळ, ता. १० : मळवली ते लोहगड दरम्यान रविवारी उत्तम वाहतूक व्यवस्था व गडावरील गर्दीचे नियंत्रण व्यवस्थित केल्याबद्दल लोहगड विसापूर विकास मंचाने प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या रविवारी (४ जुलै) लोहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. हा अनुभव लक्षात घेता पोलिस प्रशासन व भारतीय पुरातत्त्व विभागाने या रविवारी उत्तम नियोजन केले होते. लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या परिसरात हजारो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यांनी गडावर सुनियोजित व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. पोलिस प्रशासन व भारतीय पुरातत्त्व विभागाने पूर्ण तयारी केली होती. भाजेमार्गे व दुधीवरे खिंड मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक रचना करण्यात आली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता आली. तसेच ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्यामुळे वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन केले होते. बहुतेक ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक नियमनासाठी ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आलेले होते. भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील लोहगडावर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थित नियोजन केले होते. पर्यटकांना सुरक्षिततेसंबंधी लाउड स्पीकरवर सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे लोहगडावर गर्दीचे नियंत्रण राखता आले. लोहगड पर्यटकांसाठी दुपारी तीन वाजता बंद करण्यात आल्यामुळे दिवसाच्या शेवटी होणारी गर्दी टाळता आली. उत्तम व्यवस्थापनाबद्दल लोहगड विसापूर विकास मंचाचे सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, अनिकेत आंबेकर, रूपेश लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.