‘विजेचा तुटलेला खांब बदला’

‘विजेचा तुटलेला खांब बदला’

Published on

वडगाव मावळ, ता. ११ : येथील केशवनगर भागात वाहनाच्या धडकेने एक विजेचा खांब तुटला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने त्वरित खांब बदलावा अशी मागणी नगरसेवक दिनेश ढोरे यांनी केली आहे. केशवनगर भागातील गोपाळराव देशपांडे वसतीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा एक खांब बुधवारी एका वाहनाच्या धडकेने तुटला. तसेच पुढील दोन तीन खांब वाकले.
काही भागाचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. नगरसेवक ढोरे यांनी ही बाब वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या ठिकाणाहून वीज पुरवठा जोडून देण्यात आला. परंतु, सहा दिवस उलटूनही तुटलेल्या खांबाकडे मात्र, दुर्लक्ष करण्यात आले आहे. जोरदार पाऊस झाल्यास तो कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो त्वरित बदलण्याची मागणी ढोरे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.