कोंबडी खत, शेणखताची तपासणी करण्याची मागणी

कोंबडी खत, शेणखताची 
तपासणी करण्याची मागणी
Published on

वडगाव मावळ, ता. २८ : शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय खताच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी कोंबडी खत, म्हैस व गाय शेणखताचे परीक्षण करण्याची मागणी मावळ ॲग्रो प्रॉडक्ट संस्थेचे संचालक माऊली दाभाडे यांनी केली आहे. दाभाडे यांनी मावळ पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला चांगला भाव मिळावा व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ पूर्ण जिल्हा तसेच महाराष्ट्रातील इंद्रायणी प्रेमींना पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून गेल्यावर्षी हमीभाव २० रुपये ६० पैसे असतानाही २४ रुपये प्रतिकिलोने खरेदी करून शेतकऱ्यांना रोख मोबदला दिला. चालू वर्षी २१ रुपये ८३ पैसे इतका हमीभाव असतानाही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जाहीर निर्णयानुसार २८ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भात खरेदीचा दर निश्चित केला आहे. त्याचा शेतकरी सभासदांना चांगला मोबदला मिळणार आहे. बाजारात तांदळाची विक्री करताना असे निदर्शनास आले आहे की, ग्राहक वर्ग सेंद्रिय भाताची मागणी मोठ्या प्रमाणात करत असून त्याची जास्तीची किंमत मोजावयास तयार आहे. आपल्या तालुक्यात एक हजार ३०० हून पोल्ट्री व्यावसायिक आहेत. दुग्धव्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून पशूधन विकास विभागाने कोंबडी खत, गाईचे व म्हशीचे शेणखतामधील बेसिक सहा घटक नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सल्फर यांचे प्रतिकिलो प्रमाणाची तपासणी केल्यास शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय खते वापराबाबत जागृती करता येईल. रासायनिक खतांऐवजी जर सेंद्रिय खते वापरली तर पोल्ट्री व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक यांच्या मालाला चांगला भाव मिळेल व शेतकऱ्यांचा भातही चढ्या दराने विकला जाऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळ या तिन्ही विभागातील प्रत्येकी पाच पोल्ट्रीधारकांकडील कोंबडी खत, गाईचे व म्हशीचे शेणखतामधील उपरोक्त सहा बेसिक कंटेंटची मात्रा तपासल्यास खताचे योग्य प्रमाण शेतकऱ्यास देऊन जनजागृती करता येईल. मागणीचा विचार करून उपरोक्त तपासण्या करून त्याचा अहवाल प्रसारित करावा, अशी मागणी दाभाडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com