पुण्यतिथीनिमित्त शिवछत्रपतींना 
दीपवंदनेद्वारे अभिवादन

पुण्यतिथीनिमित्त शिवछत्रपतींना दीपवंदनेद्वारे अभिवादन

वडगाव मावळ, ता. २५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी दिनाच्या पूर्वसंध्येला मावळ तालुक्यातील लोहगड-विसापूर विकास मंचच्या वतीने शिवसमाधीस्थान व जगदीश्वर मंदिर प्रांगणात दीपवंदनेद्वारे महाराजांना अभिवादन करण्यात आले. रात्री जगदीश्वर मंदिरात हरी जागर, राजदरबारात इतिहास अभ्यासकांच्या, सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती तसेच शाहिरीचे कार्यक्रम झाले.
जगदीश्वर मंदिरात महापूजा, हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन व राजदरबारात शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सैन्यदलातील अधिकारी व सरदार घराणे यांचा सन्मान करण्यात आला. शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्वज्ञ आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना पुण्यातील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे उपस्थित होते. राजदरबारातील कार्यक्रमानंतर शिवप्रतिमा पालखी मिरवणूक पार पडली. त्यानंतर समाधी स्थानावर सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने छत्रपतींना मानवंदना देण्यात आली.
मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आदींसह स्थानिक उत्सव समिती महाडचे कार्यवाह संतोष कदम, अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. जगदीश्वर मंदिरातील दीपवंदना पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी व शिवसमाधी स्थानावरील दीपवंदना सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज कर्नल समीर गुजर यांच्या हस्ते करण्यात आली. हजारो दिव्यांनी शिवसमाधी व जगदीश्वर मंदिर परिसर उजळून निघाला होता. दीपवंदनेचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, महेश सोनपावले, अजय मयेकर, संदीप भालेकर, सिद्धेश जाधव आदींनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com