खंडित वीजपुरवठ्याने
वडगावकर हैराण

खंडित वीजपुरवठ्याने वडगावकर हैराण

वडगाव मावळ, ता. १० : गेल्या काही दिवसांपासून वडगाव शहरातील काही भागाचा वीजपुरवठा रात्री खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही भागाचा वीजपुरवठा रात्री सातत्याने खंडित होत आहे. रात्री खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतरच पुन्हा चालू होतो. म्हणजेच सात ते आठ तास तो खंडित असतो. कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच खंडित वीजपुरवठ्यामुळे उकाड्यात आणखी भर पडत आहे. गरमी व डासांचा प्रादुर्भाव यामुळे नोकरदारांच्या झोप लागत नाही. रात्री चोऱ्या देखील होऊ शकतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन तात्पुरती डागडुजी न करता बिघाडाचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com