होर्डिंग्जची रितसर परवानगी घ्या; अन्यथा फौजदारी कारवाई

होर्डिंग्जची रितसर परवानगी घ्या; अन्यथा फौजदारी कारवाई

वडगाव मावळ, ता.१६ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्जची रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून परवानगी घ्यावी अथवा ही होर्डिंग्ज काढून घ्यावीत, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगधारकांसाठी याबाबतचा आदेश काढला आहे. वडगाव शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये तसेच अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. ते काढून टाकावेत किंवा विहित नमुन्यात अर्ज करून परवानगी घ्यावी, अशी सूचना या आदेशात करण्यात आल्या आहेत. होर्डिंगधारकांनी सात दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन अहवाल सादर करावा तसेच अनधिकृत होर्डिंगधारकांनी रितसर परवानगी घ्यावी अन्यथा अनधिकृत होर्डिंग तात्काळ काढावे. आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायतीने दिला आहे.

मोठ्या नऊ होर्डिंग्जधारकांना यापूर्वीच नोटिसा
वडगाव शहरातील नगरपंचायत हद्दीत सध्या एकूण नऊ मोठी होर्डिंग्ज आहेत. त्यांना यापूर्वीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच रचनात्मक तपासणी अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट) देण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच एमएसआरडीसीच्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत हद्दीत असणाऱ्या व रेल्वे हद्दीत असणाऱ्या होर्डिंग्जधारकांनाही नोटिसा देऊन परवानगी घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यांनी परवानगी घेतलेली एक प्रत नगरपंचायत कार्यालयात जमा करावी अन्यथा नगरपंचायतीकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने म्हटले आहे.

अनधिकृत होर्डिंग्जधारकांनी रचनात्मक तपासणी अहवाल तसेच विहित नमुन्यात परवानगी घ्यावी अन्यथा तर एमआरटीपी ॲक्ट १९६६, एमएमसी ॲक्ट १९६५ प्रमाणे गुन्हा दाखल करून ती काढून टाकण्यात येईल. येणारा खर्च संबधितांकडून वसूल करण्यात येईल. संबंधितांनी याबाबत दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करावी.
- डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com