वडगाव मावळमध्ये 
कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

वडगाव मावळमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

वडगाव मावळ, ता. ४ ः महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला कौल दिल्याबद्दल वडगाव शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात फटाके वाजवून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, मावळ तालुका सहकार सेल अध्यक्ष सुधाकर वाघमारे, मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आफताब सय्यद, राजेश बाफना, सोमनाथ धोंगडे, तुषार वहिले, रवींद्र गायकवाड, सतीश जांभूळकर, दीपक कोकाटे, राहील तांबोळी, सचिन हिरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com