ओढे-नाल्यांची वडगावात साफसफाई

ओढे-नाल्यांची वडगावात साफसफाई

वडगाव मावळ, ता.५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडगाव नगरपंचायतीच्यावतीने ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत ओढे-नाले यांची सफाई करण्यात आली. तसेच मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करण्यात आले.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉ. निकम यांनी पर्यावरणात होणारे बदल व वाढते प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत मार्गदर्शन केले. वसुंधरेला वाचविण्यासाठी प्लास्टिक वापर करू नये. जास्तीत जास्त झाडे लावावीत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे. विजेची व पाण्याची बचत करावी. शक्य होत असेल; तर घरीच कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर करावा. सौर पॅनेल व सौर हिटरचा वापर करावा आदी सूचना केल्या. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला आहे. जंगले तोडली आहेत. प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहे. ते रोखण्यासाठी निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरूवात करावी असा सल्ला त्यांनी दिला. हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

VDM24B07634

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com