राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात

वडगाव मावळ, ता. १० : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पक्षाचा २५ वा वर्धापन दिन उत्साहात स्वतंत्रपणे साजरा करण्यात आला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हा बँकेच्या प्रांगणात तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, गणेश ढोरे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर, तालुका युवक अध्यक्ष किशोर सातकर, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, सुभाष जाधव, शिवाजी असवले, संभाजी शिंदे, नामदेव शेलार, पंढरीनाथ ढोरे, प्रवीण ढोरे, महिलाध्यक्षा दीपाली गराडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

विधान सभेसाठी तयार रहा
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीच्या कार्यालयाच्या प्रांगणात माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, युवक अध्यक्ष विशाल वहिले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, नंदकुमार कोतुळकर, रमेश घोजगे, बारकू ढोरे, पांडुरंग दाभाडे, जयश्री पवार, दत्तात्रेय आंद्रे, शंकर मोढवे, माणिक गाडे, सोमनाथ धोंगडे, आफताब सय्यद, उत्तम गाडे, संतोष वीर, सूरज पुरी, संतोष राक्षे, शंकर काळोखे, रत्नमाला करंडे, भाऊसाहेब गायकवाड, सोमनाथ पिंगळे, सुमीत पिंगळे आदी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन बाफना यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com