महावितरणचा ट्रान्सफॉर्मरच चोरीला !

महावितरणचा ट्रान्सफॉर्मरच चोरीला !

Published on

वडगाव मावळ, ता.२ : येथील एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या घरकुल वसाहत व इतर भागांना विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या डिपीवरील ट्रान्सफॉर्मरच चोरट्यांनी चोरून नेल्याने तब्बल नऊ दिवसांपासून हा परिसर अंधारात होता. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला.
गेल्या नऊ दिवसांपूर्वी वडगाव नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियम पंपाजवळील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे, घरकुल वसाहत व इतर भागांचा विद्युत पुरवठा तब्बल नऊ दिवसांपासून खंडित झाला होता. घरकुल भागातील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाने महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाला. हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी माजी नगराध्यक्ष ढोरे यांनी जेसीबी उपलब्ध करून देत सहकार्य केले. सहाय्यक अभियंता नेमाडे, राहुल लकडे, वायरमन विपुल मराठे, विलास आगळमे, पुरुषोत्तम खाडे, मोरया प्रतिष्ठानचे यशवंत शिंदे, अरुण कालेकर आदींनी याकामी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.