पानाच्या टपऱ्या
वडगावात फोडल्या

पानाच्या टपऱ्या वडगावात फोडल्या

Published on

वडगाव मावळ, ता. ८ ः अज्ञात चोरट्यांनी येथील बाजार पेठेतील दोन पान टपऱ्या फोडून आतील सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा माल व चिल्लर स्वरूपातील रोख रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
अज्ञात चोरट्यांनी येथील न्यायालयासमोर असणारी अब्दुल तांबोळी यांच्या मालकीच्या पान टपरीच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये किमतीच्या महागड्या सिगारेट्स, चिल्लर स्वरूपात असलेली सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तांबोळी यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, चोरट्यांनी चावडी चौकातील देखील एक पान टपरी फोडून आतील माल लंपास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.