मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी प्रधान

मावळ पंचायत समितीच्या 
गटविकास अधिकारीपदी प्रधान
Published on

वडगाव मावळ, ता. ३० : मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी कुलदीप प्रधान यांची नियुक्ती झाली आहे. मावळ पंचायत समितीचे यापूर्वीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची गेल्या काही महिन्यांपूर्वी मुळशी तालुक्यात बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. भागवत यांच्याकडेच मावळचा अतिरिक्त कार्यभार होता. नवनियुक्त गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी त्यांच्याकडून गुरुवारी पदभार स्वीकारला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रधान यापूर्वी उमरगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथे तीन वर्षांच्या काळात त्यांनी शिक्षण, महिला व बालकल्याण, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण भागात वनराई बंधारे, वाचनालये इत्यादी विविध उपक्रम राबविले. कोरोना काळात त्यांनी निराधार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष सहकार्य केले. मावळ तालुक्यात शिक्षण व दुर्गम भागातील सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com