कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे आज होणार लोकार्पण

कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे 
आज होणार लोकार्पण
Published on

वडगाव मावळ, ता. २ : मावळ तालुक्यात सुमारे साडेतेराशे कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमीपूजन व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय, वडगाव पोलिस ठाणे इमारत आदी पूर्णत्वास गेलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ४) कान्हे येथे होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
शुक्रवारी होणाऱ्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आमदार शेळके यांनी बुधवारी कान्हे येथे पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (ता.४) दुपारी एक वाजता सुमारे ३४ कोटी रुपये खर्चून एकवीरा मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या विविध कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता कान्हे येथे तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. येथे जाहीर सभाही होईल. कान्हे येथे बांधण्यात आलेले उपजिल्हा रुग्णालय, वडगाव येथे नव्याने बांधण्यात आलेली पोलिस ठाण्याची इमारत व पूर्ण झालेल्या पुलांचे लोकार्पण यावेळी पवार यांच्या हस्ते होइल. लोणावळा येथे सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून होणारा महत्वाकांक्षी ग्लास स्काय वॉक प्रकल्प, सुमारे ३३४ कोटी रुपये खर्चून करण्यात येणारा आंदर मावळातील ४३ किलोमीटरचा रस्ता, सुमारे ६७ कोटी रुपये खर्चून सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज मंदिर परिसरातील विकास कामे, वराळे ते नाणोली पूल आदी कामांचे ऑनलाइन भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com