सण, उत्सवाला मूळचे
वैभवशाली रूप मिळावे

सण, उत्सवाला मूळचे वैभवशाली रूप मिळावे

Published on

वडगाव मावळ, ता. ४ : ‘‘सण उत्सवांना आलेले बीभत्स स्वरूप बदलून त्यांना पुन्हा मूळचे वैभवशाली रूप प्राप्त करून द्यावे व आपली सांस्कृतिक परंपरा जपावी,’’ असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी केले .
नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचाने ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चितळे उद्योग समूहाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे होते. प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर, मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, पूजा पिंगळे, भक्ती जाधव, किरण भिलारे, गणेश ढोरे, सुनील चव्हाण, ॲड. दामोदर भंडारी आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले की, यात्रा, जत्रा, उत्सव यांची ओढ असलेली व त्यात रमणारी आपण माणसे आहोत. प्रत्येक सणामध्ये अर्थ दडलेला आहे. बैलपोळा, नाग पंचमी, दिवाळी आदी सणांमध्ये जनावरांप्रती कृतज्ञताही व्यक्त झाली आहे. संस्कृती व परंपरा जपण्याचा उद्देश सणांमध्ये असतो. परंतु गेल्या काही वर्षात गणेशोत्सव, नवरात्र आदी सणांना बिभत्स‌ स्वरूप आले आहे. ते बदलून त्यांना पुन्हा मूळ वैभवशाली रूप देण्याची गरज ठाकूर यांनी बोलून दाखवली. ढोल ताशा हे रण वाद्ये असून ही पथके ही संगीताच्या रूपाने सेवा करत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ती रक्षण करत आहेत. राज्यात सुमारे पाचशे पथके असून समाज कार्यातही ती अग्रेसर आहेत. पालकांनी कमीपणा न बाळगता आपल्या मुलांना ही कला शिकविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सिने अभिनेत्री वेलणकर यांनी व्याख्यानमाला सारखे उपक्रम ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मोरया, कानिफनाथ, नादब्रम्ह व झिटूम बाबा या ढोल ताशा पथकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. रवी आचार्य यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी स्वागत केले. मकरंद बवरे यांनी मानपत्र वाचन केले. अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती अहिरे यांनी आभार मानले.

पराग ठाकूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com