महायुतीतील इच्छुकांमध्येच लढतीची शक्यता !

महायुतीतील इच्छुकांमध्येच लढतीची शक्यता !
Published on: 

अशी झाली लढत - मावळ विधानसभा मतदार संघ
विद्यमान आमदार सुनील शेळके ः राष्ट्रवादी काँग्रेस - १६७७१२ मते ः ९३९४२ मताधिक्य


ज्ञानेश्वर वाघमारे
वडगाव मावळ, ता. १७ : गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे, राबविलेले भव्य उपक्रम व विविध योजनांमधून गरजूंना मिळवून दिलेला लाभ या जमेच्या बाजू व कमावलेला जनाधार लक्षात घेता विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास विद्यमान आमदार सुनील शेळके यांना आहे. मात्र; उमेदवारीबाबत स्व-पक्षातून व महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपमधून निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीमधील इच्छुकांमध्येच लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये मावळची जागा कोणता पक्ष लढविणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांची भिस्त आयात उमेदवारावर अवलंबून राहणार आहे. एकास एक उमेदवार देण्याचा शेळके विरोधकांचा प्रयत्न असून, तसे झाल्यास लढत रंगतदार होणार आहे. असे मावळ विधानसभेतील चित्र आहे.

अशी आहे सद्यःस्थिती -

- मावळ मतदारसंघात देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, लोणावळा या शहरी गावांचा समावेश.
-निम्मी लोकसंख्या शहरात तर निम्मी ग्रामीण भागात.
- मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य. त्या पाठोपाठ ओबीसी मतदारांची संख्या.
- मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन प्रबळ पक्ष.
- विद्यमान आमदार सुनील शेळके यांची विकासकामांच्या व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात छाप.
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता.
- आमदार सुनील शेळके यांना उमेदवारीबाबत स्वपक्षातूनच आव्हान.
- पक्षातील दुसरे इच्छुक संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या भूमिकेकडे लक्ष. त्यांनी पक्षाने देऊ केलेले महामंडळाचे उपाध्यक्षपद नाकारले व उमेदवारीसाठी धरला आग्रह.
- पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बापूसाहेब भेगडे इतर सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळवून अपक्ष लढण्याची शक्यता.
- महायुतीमध्ये मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यास भाजपचे कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून गायब होणार. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची कार्यकर्त्यांना भीती.
- भाजपने विजय संकल्प मेळावा घेऊन कमळ चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. तो कायम राहणार का याबाबत उत्सुकता.
- भाजपचे इच्छुक मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांची निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी परंतु ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का याबाबत औत्सुक्य.
- महायुतीमधील काही इच्छुकांची तुतारी हाती घेण्याबाबत चाचपणी. परंतु अद्याप निर्णय नाही.
- शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी दिसून येत नाही.
- महाविकास आघाडीची निवडणूक लढविण्याबाबत व उमेदवारीबाबत भूमिका अद्याप गुलदस्त्यात. तिन्ही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने आयात उमेदवारावर भिस्त.
-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ या एकमेव इच्छुकाने दिली मुलाखत.
- काँग्रेस पक्षाकडून तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्यासह पाच ते सहा जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. परंतु गांभीर्याबाबत साशंकता.
- मनसेची निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात. स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा.
- विद्यमान आमदार शेळके यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा सर्व विरोधकांचा प्रयत्न.

निवडणुकीचे मुद्दे -

- मावळातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्‍न
- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचा प्रलंबित प्रश्‍न.
- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची शेतकऱ्यांवर टांगती तलवार
- जुना-पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अपघातात शेजारील ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रलंबित प्रश्‍न

फोटोः 08461

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.