मावळातील आदिवासी भागांतील पाड्यांवर मतदान जनजागृती

मावळातील आदिवासी भागांतील पाड्यांवर मतदान जनजागृती

Published on

वडगाव मावळ, ता.१७ : मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचारी पथकाने (स्वीप टीम) तालुक्यातील आदिवासी भागातील गावांमध्ये जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती केली. तसेच कुणेनामा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदान करण्याविषयी पथकाने संकल्प पत्रे भरून घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुणेनामा येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन पथकाने मतदान जनजागृतीबाबत संपर्क साधला. ही तालुक्यातील पहिली ते दहावीपर्यंतची एकमेव शाळा आहे. या शाळेमध्ये रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धा घेऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. उधेवाडी येथे भेट देऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. पांगळोली येथील ठाकर वस्ती व कुणेनामा येथील केंद्राला भेट देऊन मतदान जनजागृती करण्यात आली. गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, संजय खेडकर, झोनल अधिकारी चांदोरकर आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com