वडगाव मावळ शिवजयंती जोड
वडगाव मावळ, ता.१९ : संस्था, संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरपंचायत येक्षे आयोजित कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय : येथे मुख्य न्यायाधीश आर.एन.चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवव्याख्याते ॲड. रवींद्र यादव यांचे ‘शिवकालीन न्यायव्यवस्था’ विषयावर व्याख्यान झाले. वडगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संजय वांद्रे, उपाध्यक्ष ॲड. चंद्रकांत खांदवे, ॲड.सुधीर भोंगाडे, सरकारी वकील ठाकरे, ॲड. विकास नवघणे, ॲड.अमोल दाभाडे, ॲड.राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते. ॲड. देविदास मराठे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अरविंद गोतारणे यांनी आभार मानले.
भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ : श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव रामराव जगदाळे, संचालक राजेंद्र वहिले आदींसह शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यातून ‘छत्रपती शिवरायांचे आगमन व शिवरायांचा स्त्रियांबद्दलचा आदरभाव’ विषयावर नाटिका सादर केली. प्रियांका शिंदे,अनिता हुलावळे, वसुधा रणदिवे यांनी उपक्रमाचे संयोजन केले. मुख्याध्यापक मीना अय्यर, व्यवस्थापक शहनाज अख्तर, आदिनाथ आगळमे, अभिषेक भालेराव आदींनी संयोजन केले.
छायाचित्र: १ ; वडगाव मावळ: येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना मान्यवर.
छायाचित्र २ : वडगाव मावळ: येथील श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पारंपरिक वेशभूषा करून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

