पवना कृषक संस्थेची 
पाच एप्रिलला निवडणूक

पवना कृषक संस्थेची पाच एप्रिलला निवडणूक

Published on

वडगाव मावळ, ता. ४ : उमेदवाराच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेली पवन मावळातील पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. येत्या पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. निखारे यांनी दिली.
पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक येत्या २३ फेब्रुवारी रोजी होणार होती. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सर्वसाधारण खातेदार, कर्जदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी सर्वाधिक २१, महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार, अनुसूचित जाती व जमातीच्या एका जागेसाठी दोन, मागास वर्ग प्रतिनिधीच्या एका जागेसाठी तीन, भटक्या जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचा समावेश होता. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले होते. परंतु, सर्वसाधारण खातेदार मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश गणपत माळवदकर या उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी निवडणूक प्रक्रियेतील तरतुदीनुसार ही निवडणूक स्थगित केली होती. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सहा मार्चला छाननी तर २४ मार्चला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू झाली असली तरी निवडणुकीसाठी यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहणार आहेत. त्यांना नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची नोटीस दिली असेल, त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच सध्या जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना आता नवीन प्रक्रियेत अर्ज मागे घेता येणार नाहीत, अशी माहिती निखारे यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com