होळी, धुलिवंदनानिमित्त पारंपरिक स्पर्धांचे आयोजन

होळी, धुलिवंदनानिमित्त 
पारंपरिक स्पर्धांचे आयोजन
Published on

वडगाव मावळ, ता. ९ : होळी व धुलिवंदन सणानिमित्त जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता. १४) दगडी गोटी उचलणे या शिवकालीन पारंपरिक स्पर्धेचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मंगेश तुमकर व वस्ताद उमेश ढोरे यांनी दिली.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा होईल. आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलिस निरीक्षक कुमार कदम, वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आदी उपस्थित राहणार आहेत. कुमार (२० वर्षाआतील) व वरिष्ठ (२० वर्षांवरील) अशा दोन गटातील प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट खेळाडूंना स्व. पै. केशवराव ढोरे क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सलग दोन वर्षे दगडी गोटी खांद्यावर घेऊन बैठका मारण्याचे रेकॉर्ड करणाऱ्या खेळाडूला उमेश ढोरे यांच्या वतीने चांदीची गदा भेट दिली जाणार आहे. यावेळी माजी राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू पै. चंद्रकांत सातकर, पै. संभाजी राक्षे, पै. तानाजी काळोखे, पै. राजाराम पाटील, पै. केतन घारे, पै. भक्ती जांभूळकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती उमेश ढोरे यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com