वडगावात महावीर जयंती उत्साहात

वडगावात महावीर जयंती उत्साहात
Published on

वडगाव मावळ, ता. १०: भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. येथील श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्यावतीने भगवान महावीर कल्याणक दिनानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी प्रभातफेरी व बँड पथकासह भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्री महावीर आनंद भवन येथे धार्मिक कार्यक्रम व लहान मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, मंगलपाठ आणि प्रभावना वाटप असे कार्यक्रम झाले. यानिमित्ताने उपस्थित असलेल्या कर्नाटक केसरी गणेशलालजी महाराज आणि पंडितरत्न हीराकुंवरजी महाराज यांच्या सुशिष्या जिनशासन चंद्रिका प. पू. उज्ज्वलाकुंवरजी, स्पष्ट वक्ता कीर्तीसुधाजी आणि उन्नतीश्रीजी महासतीजी यांचे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झाले.
नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेले अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, सचिव डॉ. सुनील बाफना, खजिनदार सनी सुराणा यांचा श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. वास्तुरचनाकार अक्षय कर्नावट यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ मार्गदर्शक, युवक, महिला आणि लहान मुले याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुनील बाफना, प्रीतम बाफना, आशिष बाफना यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी आभार मानले. श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा मंडळ आदींनी संयोजन केले.
वडगाव मावळ ः भगवान महावीर जयंती निमित्त व्याख्यान देताना गणेशलाल महाराज व इतर.
फोटो ः 09465

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com