वडगावात सोमवारी ‘महावाचन अभियान’

वडगावात सोमवारी
‘महावाचन अभियान’
Published on

वडगाव मावळ, ता. ११ ः मावळ पंचायत समितीच्यावतीने राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सोमवारी (ता.१४)दिवसभर ‘महावचन अभियान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वाचनातून महापुरूषांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या संयुक्त जयंती निमित्त मावळ पंचायत समितीच्या वतीने ‘महावाचन अभियान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ध्यानधारणा करून महावाचन अभियानाला सुरुवात होणार आहे. दिवसभर महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन केले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता या उपक्रमाची सांगता होईल. या अभियानात सहभागी होऊन महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले आहे. वाचन करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. अथवा आपण स्वतःचे पुस्तकही आणू शकता. अभियानात सहभागी होण्यासाठी पंचायत समितीच्या प्रशासन विभागात ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com