‘मळवली येथील उड्डाणपूल पूर्वीच्या आराखड्यानुसारच करा’

‘मळवली येथील उड्डाणपूल
पूर्वीच्या आराखड्यानुसारच करा’
Published on

वडगाव मावळ, ता. ३१ : मळवली येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास मळवलीसह पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे व पूर्वीच्या आराखड्यानुसारच उड्डाणपुलाचे काम करावे, अशी मागणी केली आहे.
मळवलीसह पाटण, बोरज, भाजे, देवले, सदापूर या गावांतील नागरिकांनी नवीन आराखड्याला एकमताने विरोध केला आहे. मळवली ग्रामपंचायतीने या संदर्भात नुकतीच ग्रामसभा घेऊन उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याच्या विरोधात ठराव मंजूर केला. तसेच उड्डाणपूल व्हावा परंतु जुन्या आराखड्यानुसार पुलाचे काम करावे असाही ठराव मंजूर केला आहे. त्याची प्रत मावळ पंचायत समितीकडे पाठवली आहे. सद्यःस्थितीत कार्ला ते मळवली, भाजे, पाटण रस्त्यावर मळवली रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा. याबाबत २०१२ मध्ये रेल्वे प्रशासनाच्या पत्रानुसार पूर्वी मंजूर केलेला उड्डाणपूल कायम करण्यात यावा. २०१९-२० मध्ये सर्वेनुसार केलेल्या आराखड्या (नकाशा) प्रमाणे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरावाला मंजुरी देण्यात आली. अनेकांची घरे व दुकाने बाधित होत असल्याने नवीन आराखडा सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक, जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य अभियंता पुणे, मावळ पंचायत समिती आदींना मळवली ग्रामपंचायतीकडून ठरावाची प्रत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com