पवना बंदिस्त जलवाहिनी योजना कायमची रद्द करा

पवना बंदिस्त जलवाहिनी योजना कायमची रद्द करा

Published on

वडगाव मावळ, ता. ८ : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनाला शनिवारी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ही योजना कायमस्वरूपी रद्द करून बाधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील संपादनाचे शेरे काढून टाकावेत, अशी मागणी मावळ तालुका किसान मोर्चा व भूमाता शेतकरी कृती समितीने केली आहे.

पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत सोरटे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार, विलास दळवी, गुलाबराव घारे, चंद्रकांत ठोंबरे, भरत ठोंबरे, चिंधू म्हस्के, बाळासाहेब शिंदे आदींनी याबाबत नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पाण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प नियोजित होता. परंतु याला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यातूनच ऑगस्ट २०११ मध्ये द्रुतगती मार्गावर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. त्याला हिंसक वळण लागून पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अनेक आंदोलक शेतकरी जखमी झाले. दरम्यान, या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध आजही कायम आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उतऱ्यावर ‘निगडी जलशुद्धीकरण केंद्र बंद पाइपलाइनसाठी संपादित’ असे शेरे आजही आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तेथे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक काम करता येत नाही. अथवा शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com