पिंपरी-चिंचवड
स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या रक्तदान शिबिर
वडगाव मावळ, ता. १३ : स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१५) वडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोन युवा शाखा यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सुनील पारख यांनी दिली. वडगाव येथील जैन स्थानकात शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळेत हे रक्तदान शिबिर होईल. संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यासाठी ऋषभ दुगड यांनी यासाठी सहकार्य केले आहे.